शिक्षण

जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यलाय अणदूर, तालुका तुळजापूर येथे इयत्ता चौथी व सातवीत होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण केली.सातवि इयत्तेतील शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला.
११वि चं शिक्षण घेत असताना च नळदुर्गच्या अंजनी प्रशालेत नोकरी केली .सकाळी कॉलेज, दुपारी कॉलेजातील नोकरी त्यांनतर उशिरा पर्यंत संघटनेचे काम असा दिनक्रम होता.
बाल शिक्षण संस्थेचे कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नळदुर्ग ,तालुका तुळजापूर येथे B.Sc. MSW ची पदवी मिळवली.

११वी त महाविद्यालयात असताना १९९० साली ‘काश्मीर बचाओ’ या आंदोलनात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला.
अणदूर येथे अभाविपचे मंत्री म्हणून काम करत असताना विवेकानंद वाचनालय सुरु केले तसेच गावातील स्वच्छतेविषयी जनजागरण आणि आंदोलनही केले.
आदिवासी विद्यर्थ्यांच्या वसतिगृहात दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत तसेच आश्रम शाळांच्या प्रश्नांविषयी सातत्याने आवाज उठवत आंदोलने केली
ठाणे जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात विद्यार्थी चळवळीमध्ये सहभाग घेतला.अनेक विद्यार्थी आंदोलनात यशस्वी नेतृत्व केले.
उत्तर पत्रिकेचे झेरॉक्स मिळावे यासाठी च्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आंदोलनातही मोलाचा वाटा होता.
वनवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांविषयी मुंबईत झालेल्या ‘ठिय्या आंदोलनात’ महत्वाचे योगदान दिले.
विद्यार्थी परिषदेच्या अंतर्गत नवनवीन कार्यक्रम , आंदोलने, जनसंपर्क, विद्यार्थी परिषदेच्या कार्याला वेगळी दिशा देणं, महाराष्ट्राची शैक्षणिक स्थिती व त्यातील समस्या सोडवण्याकरिता मार्ग काढणे अशा अनेक विषयांत धडपड केली.
परीक्षा पद्धतीमध्ये पारदर्शकता येण्यासाठी उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स मिळाली पाहिजे यासाठीचे आंदोलन केले असता ते यशस्वी हि ठरले.
शिक्षणाचे होणारे बाजारीकरण शिक्षणाची अवाच्या सव्वा आकारली जाणारी फी तसेच साधन-सुविधांचा अभाव , अपुरे व कमी गुणवत्तेचे शिक्षकवर्ग आणि ग्रंथालय व प्रयोग शाळा याची अपुरी व्यवस्था हे सर्व लक्षात घेता, शिक्षणव्यवस्थेच्या विरोधात आंदोलन पुकारून थेट सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले व कोर्टाने ‘शुल्क नियंत्रण समिती’ आणि प्रवेश नियंत्रण असली पाहिजे असा निर्णय दिला.