सामाजिक व राजकिय प्रवास

बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करत असल्याने समाज हितोपयोगी निस्वार्थ सेवाभाव ठेऊन संघाच्या प्रत्येक कार्यात सहभाग नोंदवत आले आहेत.
विद्यार्थी परिषदेत काम करत असताना वाडा, जव्हार, तलासरी, मोखाडा अशा दुर्गम भागातील अतिशय छोट्या मोठ्या प्रश्नाचे निरसन केले.
तलासरी, जव्हार परिसरातील कम्युनिस्टांच्या गुंडागर्दीस सडेतोड उत्तर देत विदयार्थी संघटना बांधणी केली.
समर्थन परिषद व संवाद पथकाच्या माध्यमातून नामांतर समर्थनार्थ समाज मानस तयार करण्यासाठी पुढाकार घेतला.
१९९४ ते २००६ या काळात संस्थेच्या राष्ट्रभक्ती व संस्कृती प्रसार तसेच संवर्धनासाठी अनेक कामे केली.
२००६ मध्ये मराठवाड्यात भारतीय जनता पक्षाचे संघटन मंत्री म्हणून पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ऊस दरवाढीचे आंदोनात सहभाग घेतला.
मराठवाडा युवक विकास मंडळ अध्यक्ष म्हणून चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियानामध्ये सक्रिय सहभाग घेतला.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना Intrnational justice missionच्या अंतर्गत मुलांच्या हक्कांसाठी तसे लैंगिक अत्याचार आणि पिळवणूक यापासून मुलांची सोडवणूक व्हावी म्हणून ‘चिराग’ mobile app launch केले.
अनाथ व रस्त्यावरील मुलांना आधार कार्ड मिळवून देण्याचे काम केले.
JJ ACT तसेच POCSO ACT च्या अंमलबाजवणी संबंधी विविध बैठका व उपक्रम राबविले.
लैंगिक शोषणाचे बळी ठरलेल्या मुलांसाठी पुनर्वसन व कायद्याची अंमलबाजवणी आणि तरतूदी सम्बंधात विविध प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले.
बालकांच्या सुरक्षेसाठी रक्षा अभिया राबविले.
धार्मिक स्थळे ‘बाल भिक्षेकरी मुक्त’ करण्याचे प्रयत्न व तशा योजना राबविल्या जात आहेत.
ग्राम बाल संरक्षण समित्या सक्षमीकरणासाठी विविध प्रयत्न चालू आहेत.
‘Family for every child’ अभियान राबवत दत्तक प्रक्रिया, प्रतिपालकत्व प्रक्रिया व प्रायोजकत्व यासाठी सातत्याने पुरवठा सुरु आहे. राज्यातील प्रत्येक बालकास कुटुंब मिळाले पाहिजे या उदात्त हेतूने याविषयी नियमावली बनवण्यास बाध्य केले. यानुसार कार्यवाही करण्यासाठी ते आग्रही आहेत..